Ad will apear here
Next
आमच्या आयुष्यातील काही आठवणी
न्यायमूर्ती रानडे हे एकोणिसाव्या शतकातील अनेक चळवळींचे आधारस्तंभ होते. स्वातंत्र्य चळवळींबरोबरच सामाजिक, राजकीय, धार्मिक, नैतिक, औद्योगिक, शिक्षणविषयक विचारही ते करीत असत. निर्भीड न्यायमूर्ती म्हणून त्यांची ख्याती होती. त्या काळातील कर्मठपणाला त्यांनी कधी थारा दिला नाही. म्हणून तर घरच्यांचा विरोध पत्करून त्यांनी पत्नी रमाबाईंना लिहायला, वाचायला शिकविले.

रमाबाई रानडे या न्यायमूर्ती रानडे यांच्या फक्त पत्नीच नव्हत्या, तर त्यांच्या छाया होत्या. त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ हे आत्मचरित्र वाचताना रमाबाई यांचे व्यक्तिमत्त्व किती प्रभावी होते हे लक्षात येते. आपल्याला घडविणाऱ्या पतीचे गुणगान त्यांनी यात केले आहे.

रानड्यांचा पूर्वेतिहास, न्यायमूर्तींचे सार्वजनिक कार्य, याविषयी लेखन केले आहे. मुख्य भर आहे, तो त्यांच्या कौटुंबिक आठवणींवर. पत्नीने पतीबद्दल लिहिलेल्या या ग्रंथात न्यायमूर्तींचा स्वभाव, आयुष्यक्रम वाचायला मिळतो. या दोघांच्या आठवणीतून त्यांचे श्रेष्ठत्व अधोरेखित होते.

पुस्तक : आमच्या आयुष्यातील काही आठवणी
लेखक : रमाबाई रानडे
प्रकाशक : वरदा प्रकाशन
पाने : २७२
किंमत : ३०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZSWBZ
Similar Posts
संपूर्ण पंचतंत्र प्राचीन भारतीय लोककथांचा हा सर्वाधिक लोकप्रिय संग्रह मानला जातो. या संग्रहातील सत्तराहून अधिक लोककथा पाच भागांत विभागल्या आहेत. पंचातंत्रांची रचना शास्त्रविमुख राजपुत्रांना नीतिशास्त्रज्ञ बनविण्यासाठी झाली आहे. मूळ संस्कृतमध्ये असलेल्या या पंचातंत्राचा ह. अ. भावे यांनी केलेला हा अनुवाद आहे. लोकसाहित्याचे अभ्यासक रा
छत्रपती शिवाजी महाराज महाप्रतापशाली शिवाजी महाराज यांच्या अतुलनीय पराक्रमाचे विस्तृत वर्णन कृ. अ. केळुसकर यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या चरित्रलेखनातून केले आहे. या चरित्राची पहिली आवृत्ती १९०६मध्ये प्रसिद्ध झालेली आहे. याची नववी आवृत्ती वाचकांसाठी सध्या उपलब्ध आहे.
स्त्रियांसाठी योगा + दातांची सुरक्षा रोजच्या कामांच्या यादीत स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला स्त्रियांना वेळ मिळत नाही आणि अखेर वयाबरोबर शारीरिक दुखणी सुरू होतात. ते टाळण्यासाठी घरच्याघरी योगाभ्यास उपयुक्त ठरतो.
सम्राट अशोक चरित्र सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी भारतात आपले आधिपत्य निर्माण करून इतिहास अजरामर झालेला सम्राट अशोक हा राजा होऊन गेला. त्याने फक्त राज्यच केले असे नाही, तर त्याने जनतेला धर्मज्ञान, सदाचार, भूतदया या गुणांची शिकवण दिली. प्रजेने या तत्त्वांवर चालावे अशी आशा त्याने केली आणि तसा प्रयत्न आयुष्भर केला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language